Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर

जेष्ठ साहित्यकार विश्वास पाटील यांच्या हस्ते १८ जुलै रोजी होणार सन्मान

marathinews24.com

पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्फूर्ती दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक तथा ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता, पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन – सविस्तर बातमी

या कार्यक्रमानिमित्त “मराठी समीक्षाकांना अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आवाका पकडता आला का?” या विषयावर विशेष महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेत ज्येष्ठ साहित्यिक विश्वासराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील भंडगे तसेच विचारवंत प्रा. आसमा शेख हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.

याच कार्यक्रमात माणुसकीच्या चळवळीचे संस्थापक राज देशमुख तसेच नांदेड येथील कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

साहित्य, कला, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह प्रवीण तरडे यांचे चाहते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×