शिक्षक अभियोग्यता परीक्षेसाठी नवीन अधिसूचना प्रसिद्ध
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी सुधारित तरतूदीबाबत शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
सुधारित तरतुदीनुसार व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवारही या चाचणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करु शकतील. पात्र उमेदवारांनी http://ibpsonline.ibps.in/mscepmar25 या लिंकद्वारे विहित मुदतीत आवेदन पत्र सादर करावेत, असेही ओक यांनी कळविले आहे.