गोवंश तस्करीचा पोलिसांनी लावला छडा, मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त
marathinews24.com
पुणे – गोमांस वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात आला आहे. प्रकरणात पोलिसांनी २०० गोमांस व रिक्षा असा ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना ४ मे ला सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी समाजसेवक अथर्व विनोद सातव (वय २४, रा. भैरोबानगर, विश्रांतवाडी, पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पादचाऱ्याचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला अटक, ६ मोबाईल, दुचाकी जप्त – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातव हे गोरक्षणाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेशी संलग्न आहेत. त्यांना ४ मे ला सकाळी साडेआठच्या सुमारास लुल्लानगर चौक ते भैरवनाथ मंदिर दरम्यान एक रिक्षा गोमांस वाहतूक करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. सातव यांनी तात्काळ सहकाऱ्यासह संबंधित ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी रिक्षाचा (क्रमांक एम एच 12 बीडी 0087) पाठलाग केला असता, तो चालक गाडी सोडून पळून गेला. सातव यांनी रिक्षाची तपासणी केली असता त्यात गोमांस, धड, मुंडके व इतर अवशेष सापडले. त्यानुसार त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन रिक्षाची झडती घेतली. त्यावेळी २०० किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी रिक्षासह गोमांस जप्त केली. या घटनेमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. गोमांस वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.