मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीत दाखल
marathinews24.com
बारामती – अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे होत असलेल्या राज्य मंत्रीपरिषद बैठकीकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, इंदापुरचे तहसीलदार जीवन बनसोडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम उपस्थित होते.