Breking News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्तानैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्यापत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जबरी चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाश

जबरी चोऱ्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाश

दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात बीड एलसीबी पथकाला यश आले आहे. वडवणी येथील दाखल चोरीच्या गुन्ह्यात दोन संशयितांना चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री माजलगाव तालुक्यातील लवूळ येथे करण्यात आली.मिथुन दादाराव साळवे (वय २५ रा. रमाई नगर वडवणी) आणि रोहन कल्याण केकाण (वय २५ रा.जुना मोंढा वडवणी) यांना अटक केली आहे.

‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ? – सविस्तर बातमी 

वडवणी येथे दाखल गुन्ह्याचा समातंर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड व पोलीस ठाणे वडवणी हे करीत होते. तपासा दरम्यान मंगळवारी (दि.१८) एलसीबी पथक माजलगाव तालुक्यात गस्तीवर होते. यावेळी पथक प्रमुखांना माहिती मिळाली की आरोपी मिथुन साळवे, रोहन केकाण या तिघांनी मिळून गुन्हा केला आहे. ते सध्या प टाटा सुमो वाहनाने लवूळ येथून पात्रुडच्या दिशेने येत आहेत. त्यानुसार एलसीबी पथकाने पात्रुड ते तेलगाव असा पाठलाग केला. ते पळून जाण्याच्या आधी शेतातून मिथुन दादाराव साळवे (वय २५ वर्षे) रा. रमाई नगर वडवणी, रोहन कल्याण केकाण (वय २५ वर्षे) रा.जुना मोंढा वडवणी या दोघांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील वरील गुन्हा केल्याची कबुली दिली.

दोन्ही संशयित आरोपी ताब्यात घेऊन टाटा सुमो वाहनांसह १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील तपासासाठी वडवणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबोजागाई, उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश विघ्ने, महेश जोगदंड, जफर पठाण, बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते, गणेश मराडे यांनी केली. कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×