Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यासह जुन्या वादातून अल्पवयीन मुलाच्या डोक्यात हातोड्याने मारून खून केल्याची घटना मध्यवर्ती लॉ कॉलेज रोडवर घडली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नील नाईक (वय १४, रा. श्रावनाधारा, कोथरूड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (दि. १८) मध्यरात्री ही घटना घडली असून, बुधवारी सकाळी मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले आहे.

पुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील आणि आरोपी ओळखीचे असून त्यांच्यात जुने वाद झाले होते. नीलच्या चुलत भावाने यातील अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. तेव्हापासून त्यांच्यात वाद टोकाला गेले होते. नील हा व्हॉट्सअपला खुन्नस देणारे स्टेट्स अपलोड करत होता. तो सतत स्टेट्स ठेवत असल्याने आरोपींना त्याच्याबाबत राग होता. दरम्यान, नीलला आरोपींनी लॉ कॉलेज रोडवरील टेकडीवर भेटण्यासाठी बोलावले. तो आला असता, दोन आरोपींनी त्याला गाठून लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यात मारहाण केली. त्याचा निर्घुन खून केला.

बुधवारी सकाळी नीलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात नेला. मात्र, दुपारपर्यंत मुलाची ओळख पटली नाही. प्रथम पोलिसांनी त्याची ओळख पटवली. तो नील नाईक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी खूनाचा छडा लावत दोघांना ताब्यात घेतले. अधिक तपास कोथरूड पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×