Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतले

पुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतले

तथाकथित कोंढव्यातील गुरूला बेड्या

marathinews24.com

पुणे – शरिरातील नकारात्मक उर्जा घालवण्याची बतावणी करीत तथाकथित अध्यात्मिक गुरूने तरूणीला भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मागवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी दिव्य जितेंद्र परमार (वय २३ रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) या अध्यात्मिक गुरूविरूद्ध विनयभंगासह जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ चे कलम ३(२)कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला अटक केली असून, पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरूणीने फिर्याद दाखल केली आहे.

सहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिव्य परमार हा कोंढव्यात राहायला असून, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने प्रेरणादायी वक्ता असल्याचा स्वतः प्रचार केला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर युट्यूब चॅनेल सुरू केले. त्याद्वारे सेमीनार घेउन त्याने स्वतःला बाबा म्हणवून घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, प्रेरणादायी भाषण देत असताना त्याने महिलांसह मुलींना व्यायामाच्या टिप्स दिल्या. त्यानंतर संबंधित तक्रारदार तरुणी आरोपी परमार च्या संपर्कात आली.

त्यावेळेस त्याने तिला फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तुझ्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी गेली आहे, ती काढण्यासाठी तुझे अर्धनग्न फोटो पाठव अशी मागणी केली. तक्रारदार तरूणीला भीती दाखवून आरोपी परमारने तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलद्वारे मागून घेतले. याप्रकरणी तरूणीने नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीविरूद्ध (विनयभंग) तसेच जादूटोणा प्रतिबंध कायदा २०१३ चे कलम ३(२)कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×