Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

सहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

सहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

‘ऊर्जा स्पावर गुन्हे शाखेची छापा कारवाई; संचालकाला अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील सहकारनगर परिसरातील स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला. कारवाईत ५ पीडित महिलांची सुटका केली असून, स्पा सेंटर चालवणाऱ्याला अटक केली आहे. आप्पा दशरथ फसले (वय ४८, रा. कृष्णकुंज सोसायटी, साळवे गार्डन जवळ, अपर इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

फॉरेक्स ट्रेडींगच्या बहाण्याने तरुणाची ४७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगरच्या हद्दीत ‘ऊर्जा स्पा’ सेंटर असून, तेथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ५ महिलांची सुटका केली. स्पा सेंटर चालवणाऱ्या आप्पा फसले याला अटक केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमेय रसाळ, इम्रानखान नदाफ, अविनाश कांबळे, रेश्मा कंक, वैशाली खेडेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×