वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – फॉरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ४६ लाख ८४ हजारांचा आर्थिंक गंडा घातला आहे. ही घटना मे २०२५ ते मार्च २०२६ कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डेक्कनमधील फ्लाईंग कॅफे मालकासह दोघांना अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वानवडीत राहायला असून, १ मे २०२५ रोजी सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित करून काही रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाकडून तब्बल ४६ लाख ८४ हजार रूपये वर्ग करून घेतले. त्यांना परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैâलास डाबेराव तपास करीत आहेत.
तरुणीला कमाईचे आमिष पडले ७ लाखांना
गुगल टास्कची लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी तरुणाला अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध बँकखात्यात रक्कम पाठवण्यास भाग पाडून तरूणीला तब्बल ७ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना ६ ते १२ ऑगस्ट २०२६ कालावधीत मांजरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणीने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.




















