Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

नैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या पतीला अटक

स्वारगेट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – बीड येथील राष्ट्रीय स्तरावरील खो-खोपटू तुकाराम गंगाधर करांडे (वय २८) याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गुलटेकडी भागात मंगळवारी ही घटना घडली.

पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

करांडे मूळचा बीड जिल्ह्यातील खडकी देवळा गावचा रहिवासी होता. तो बीडमधील स्वराज्यनगर भागात राहत होता. राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत तो सहभागी झााला होता. काही दिवसांपूवी तो पुण्यात आला होता. गुलटेकडी भागात तो मित्रांसोबत राहत होता. मंगळवारी रात्री त्याचे मित्र कामानिमित्त बाहेर पडले तेव्हा त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

१५ दिवसांपूर्वी बीड शहरात करांडे याला बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो नैराश्यात होता. या प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुण्यातील गुलटेकडी भागात मित्रांकडे राहायला आला. प्राथमिक चौकशीत त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×