Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न

शेतजमिनीतील रस्त्याच्या वादातून भावंडांवर हल्ला

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुलगा होत नाही, असे म्हणून पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करुन गर्भ मुलीचा आहे, हे समजल्यावर पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून – सविस्तर बातमी 

पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि सासु अनुसया रंगराव टोणे (रा. पी एस व्हीला, शेवाळेवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत त्यांच्या पत्नीने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याचे समजल्यावर धनाजी टोणे हे सुट्टीवर गेले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी टोणे हे मांजरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांचा १९ मे २०१९ रोजी जत येथे विवाह झाला आहे. लग्नानंतर धनाजी टोणे यांची मुंबईत नेमणुक होती. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी तू नोकरी कर, कमव, माझ्या जीवावर बसून खाऊ नको, तुला तुळशीसारखी सडवीन, तु घरातील काम व्यवस्थित करत नाहीत, असे म्हणून सातत्याने मारहाण केली. मानसिक शारीरीक छळ, अश्लिल शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली. पत्नी २०२० मध्ये गर्भवती असताना दर तीन चार दिवसांनी आरोपी तिला मारहाण करत होता. सातव्या महिन्यात अंगावर बसून बेदम मारहाण केली. २७ जानेवारी २०२२ मध्ये धनाजी टोणेवर मुंबई येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल केला. त्याचा राग घरी येऊन काढून पत्नीचे डोके जमिनीवर आपटून अमानुष मारहाण केली. घरातील साहित्य घेऊन काही एक न सांगता ते महिनाभर कोठे तरी फरार झाला.

मार्च २०२२ मध्ये त्यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली. तेव्हापासून ते शेवाळवाडी येथील पी एस व्हिला सोसायटीत राहतात. मार्च २०२५ मध्ये त्यांची पत्नी पुन्हा गर्भवती राहिल्या. तीन महिन्यांची गरोदर असताना १३ मे २०२५ रोजी धनाजी टोणे व त्यांच्या आईने त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणत्यातरी खेडेगावातील शेतातील घरात नेऊन पत्नीची गर्भलिंग तपासणी केली. १९ मे २०२५ रोजी गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पत्नीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. गर्भपात केला नाही तर दोन्ही मुलींना घेऊन तुला माहेरी जावे लागेल, माझ्यासोबत नांदायला थांबायचे नाही, अशी धमकी दिली. गर्भपाताला संमती देण्यास तिच्या वडिलांनी नकार दिल्यावर धनाजी टोणे यांनी ‘‘मी पोलीस उपनिरीक्षक आहे. मी अनेक लोकांना गाडले आहे. तुम्ही संमती कशी देत नाही, तेच पाहतो’’ अशी धमकी दिली.

वाघोली येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये २३ मे २०२५ रोजी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. मानसिक संतुलनही बिघडले होते. त्यामुळे त्या माहेरी राहिल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलीस उपायुक्त यांनी त्यांच्या पतीला सक्त भाषेत समज दिली. त्यानंतर घरी गेल्यावर पतीने तू तक्रार का केली म्हणून तिला मारहाण केली. घरी भाजीपाला व घरगुती साहित्य आणून देत नसल्याने त्या ऑक्टोबर २०२५ मध्ये माहेरी गेल्या. त्यानंतर त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांनी त्याला दाद दिली नाही. आता त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ती मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे. पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×