Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

बालिका अत्याचारासह हत्या; दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणार

कोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती

marathinews24.com

मुंबई – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. यासंदर्भात आपण पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटना – सविस्तर बातमी

या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

फास्ट ट्रॅक कोर्टासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार

​घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, “हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.”

पीडित कुटुंबाची लवकरच घेणार भेट

​पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्या लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.​

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×