Breking News
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठारजेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडाइमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून दोघे कामगार ठारजलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन-रन फॉर वॉटर ’साठी प्रशासन सज्जपुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६७ लाखांची फसवणूक‘धर्मस्वातंत्र्य’ कायदा लागू होण्यापूर्वी पुणे पोलिसांकडून कारवाईची घाई ?दुबईहून आलेला तरुण पुणे विमानतळावरुन बेपत्तानैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्यापत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

केसनंद-लोणीकंद रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकचालकाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना १९ ऑगस्टला सकाळी साडेनउच्या सुमारास केसनंद-लोणीकंद रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी चंद्रसिंग सोनवणे (वय २२ रा. बकोरी, हवेली) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल ठाकरे (वय २९ रा. बकोरी, हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

जेष्ठाच्या मोबाइलचा ताबा घेउन ४ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल ठाकरे आणि त्यांचा भाचा सनी सोनवणे हे १९ ऑगस्टला सकाळी नउ वाजता दुचाकीवरून प्रवास करीत होते. केसनंद-लोणीकंद रस्त्यावर खंडोबा मंदीरापुढे कंपनीजवळ भरधाव ट्रक चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोघेही खाली पडले. अपघातात सनी सोनवणे गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

कामगाराचा अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

ज्वेलर्समध्ये काम करणार्‍यानेच तब्बल अडीच लाखांच्या चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना १० एप्रिल ते १० मे कालावधीत रविवार पेठेतील सोन्या मारूती चौकातील दुकानात घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार पेठेत राहणार्‍या सराफाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधार्थ पोलीस आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ६१वर्षीय सराफ असून, रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात त्यांचे मेसर्स चिमणलाल भबुततमल अ‍ॅण कंपनी असे दुकान आहे. त्यांच्याकडे एक कामगार कामाला होता. त्याने १० एप्रिल ते १० मे २०२६ कालावधीत दुकानातील मालकाची नजर चुकवून अडीच लाखांचे चांदीचे दागिने व मुर्ती चोरून नेली आहे. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक लाला लोणकर तपास करीत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×