अटकेच्या तरूणाला ४ लाख ६५ हजारांचा गंडा
marathinews24.com
पुणे – क्राईम ब्रॉन्च दिल्ली आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाला ४ लाख ६५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ ते १८ सप्टेंबर २०२४ कालावधीत वारजे माळवाडीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारक चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्राचा गळा आवळून ठार मारले, दोन महिन्यांनी खूनाला वाचा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण वारजे माळवाडीत राहायला असून, १७ सप्टेंबरला सायबर चोरट्याने त्याला फोन केला. क्राईम ब्रॉन्च दिल्ली आणि सीबीआय ऑफिसर बोलत असल्याची बतावणी केली. तक्रारदार तरूणाच्या आधारकार्डचा गैरवापर करून सीमकार्ड खरेदी केले आहे. त्याचा वापर ह्युमन ट्राफिकिंंगसाठी केला जात असल्याचे सांगून सायबर चोरट्याने तरूणाला अटक करण्याची धमकी दिली. सर्व केस क्लिअर करण्यासाठी एनओसी प्रमाणपत्र देतो असे सांगून चौकशीच्या बहाण्याने बँकखात्याची माहिती चोरट्यांनी त्यांना विचारली. त्यानंतर बँक खात्यातील ४ लाख ६५ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगर्ड तपास करीत आहेत.
नागरिकांनो घाबरू नका, अनोळखी कॉलला उत्तर देउ नका
नागरिकांनो तुम्हाला जर अनोखळी क्रमांकावरून सातत्याने कॉल येत असतील तर टाळणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित सायबर चोरट्यांकडून तुम्हाला विविध प्रकारची भीती दाखवून ऑनलाईनरित्या लुट केली जाउ शकते. मागील काही महिन्यांत सायबर चोरट्यांनी नागरिकांना वेठीस धरून लुट केली आहे. प्रामुख्याने सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करीत ऑनलाईन रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले आहे. मात्र, अशाप्रकारे जर तुम्ही काहीच गुन्हा केला नसेल तर सीबीआय अधिकारी किंवा दिल्ली पोलीस नोटीस दिल्याशिवाय अटकेची काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे नागरिकांनो घाबरू नका, अनोळखी कॉलला उत्तर देउ नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.