४० लाखांचा घातला गंडा
marathinews24.com
पुणे – जनरेली इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला प्रीमियम भरण्यास सांगितले. त्यानंतर पैसे वर्ग करण्यास भाग पाडून तब्बल ४० लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते जून २०२६ कालावधीत फुरसुंगी गावात घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय तक्रारदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बेशिस्त बुलेटराजांसह रस्त्यावरील वाढदिवस रडावर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार फुरसुंगीत राहालया असून, डिसेंबर २०२५ मध्ये सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधला होता. जनरेली इंडिया लाइफ इन्शुरन्स कंपनीचा एजंट असल्याची बतावणी त्यांना केली. इन्शुरन्सचा प्रिमियम भरण्यास सांगून त्यांना पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल ४० लाख रुपये ऑनलाईनरित्या वर्ग केल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक खांडे तपास करीत आहे.
सहकारनगरमधील जेष्ठाला २७ लाखांचा गंडा
सायबर चोरट्याने विविध कारणे सांगून सहकारनगरमध्ये राहणार्या ७२ वर्षीय जेष्ठाला २७ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ ते २५ ऑगस्ट २०२६ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय जेष्ठाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, विविध बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करीत आहेत.


























