Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात सराइतांकडून तीन पिस्तुले, चार काडतुसे जप्त

कात्रज परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – सराइतांकडून देशी बनावटीचे तीन पिस्तुले, तसेच चार काडतुसे असा शस्त्रसाठा भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केली. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली. ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार, धनकवडी), शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फॉर्म भरण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेला लुटले – सविस्तर बातमी

आंबेगावमधील साईसिद्धी चौकात पवार थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल, दोन काडतुसे जप्त केले. त्यानंतर खोपडे हा कात्रज डेअरी परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून दोन पिस्तुले, दोन काडतुसे जप्त केली. पवार आणि खोपडे यांनी पिस्तूल का बाळगले ? , तसेच त्यांना पिस्तूल कोणी दिले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, रवी जाधव, सागर बोरगे, मितेश चोरमले, अभिनय चौधरी,सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, सोहम शेंडकर, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×