Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

पुण्यात आंतरराष्ट्रीय एमडी तस्करीचा पर्दाफाश

अमली पदार्थ विरोधी कृती दलाची कारवाई

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करताना अमली पदार्थविरोधी कृती दलाने (एएनटीएफ) आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ पुरवठा साखळीचा पर्दाफाश केला. मेफेड्रोन (एमडी) तस्करीप्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३६ ग्रॅम एमडी, ८ मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. सेनेगल आणि किंगडम ऑफ इस्वातिनीच्या नागरिकांचा सहभाग उघडकीस आल्याने या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे.

कौटुंबिक छळाकडे डोळेझाक करणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करा- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

विक्रम कालेकर (३०, रा. कर्जत, जि. रायगड) याच्यासह सिसे सादिओ ऊर्फ अलेक्स (३०, सेनेगलचा नागरिक, रा. डोंबिवली) जेले बियासमार्क (३०, किंगडम ऑफ इस्वातिनीचा नागरिक, रा. कर्जत) यांना अटक केली आहे. बाणेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना एएनटीएफच्या पथकाने ही कारवाई केली. २६ जूनला गुन्ह्यात ९८ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक केली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या.

तपासात या प्रकरणाचे धागेदोरे थेट डोंबिवली आणि कर्जतपर्यंत पोहोचले. अटक आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील, मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण आणि इतर तांत्रिक बाबींचा दोन महिन्यांहून अधिक काळ बारकाईने तपास करण्यात आला. या तपासातून अमली पदार्थ पुरवठा साखळीतील महत्त्वाचे दुवे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर डोंबिवली आणि कर्जत परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. सिसे सादिओ याच्याकडून २२ ग्रॅम एमडी, आठ मोबाईल आणि लॅपटॉप, तर जेले बियासमार्क याच्याकडून १४ ग्रॅम एमडी जप्त केले. अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्‍या प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ज्‍योतीप्रिया सिंग, उपमहानिरीक्षक प्रविण पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

परदेशी नागरिकांकडून पुण्यात पुरवठा?

दोन्ही परदेशी नागरिक महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या माध्यमातून एमडीचा पुरवठा नेमका कुठून होत होता, त्यांना अमली पदार्थ कोण पुरवत होते आणि पुण्यासह अन्य शहरांमध्ये त्याचे वितरण कोण करत होते, याचा शोध एएनटीएफकडून घेतला जात आहे. त्यामुळे या कारवाईतून अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय साखळीतील आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. दरम्‍यान अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा सेवनाची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे एएनटीएफकडून सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×