मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीवर विशेष शाखेची कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सुमारे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष शाखेने (एसबी) आणि मिलिटरी इंटेलिजन्सने (एमआय) संयुक्त कारवाई केली. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली आहे. सोनिया अख्तर, मोतियार गाजी आणि सोनिया मोती पान या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
पुण्यात आंतरराष्ट्रीय एमडी तस्करीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी
कागदपत्रांच्या पडताळणीत तिघेही हिंदुस्थानात बेकायदा प्रवेश करून पुण्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर तिघांविरुद्ध कारवाई करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याच्या (डिपोर्टेशन) प्रक्रियेसाठी ताब्यात ठेवले जाणार आहे. दरम्यान, शहरातील परप्रांतीयांच वस्ती असलेल्या भागांमध्ये पोलिसांकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. बेकायदा वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तसेच अशा व्यक्तींना आश्रय किंवा मदत करणार्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


























