Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

टोळक्याविरुध्द गुन्हा

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साक्षर महेश अडागळे (वय २५, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. साई शिंदे, राहुल ख्याडगी, मोहन जीवन विद्यासागर (तिघे रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी साक्षर अडागळे हा बिबवेवाडीतील समर्थनगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला अडवले. ‘भावेश मोरेशी वाद का घालतो ?’, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी अडागळे याच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्या वेळी अडागळे याच्या मित्राच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी मित्राच्या आईला शिवीगाळ केली. भांडणात मध्यस्थी केली तर अडागळेला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×