Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

३० वर्षीय मुलाला पोलिसांकडून अटक

marathinews24.com

पुणे – विश्रांतवाडीतील शांतीनगर वसाहतीत कौटुंबिक वादातून मुलाने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली. सविता सुरेश हरिभक्त (वय ४८, रा. शांतीनगर वसाहत, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा अनिकेत (वय ३०) याला अटक करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (२९ ऑगस्ट) सविता आणि त्यांचा मुलगा अनिकेत यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. त्याने कौटुंबिक वादातून आईला मारहाण केली. मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील सविता यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. मध्यरात्री अनिकेत याला पोेलिसांनी अटक केली. अनिकेत विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. प्राथमिक चौकशीत अनिकेतने कौटुंबिक वादातून आईचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे-भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहित श्रीमंत शिंदे (वय २६, रा. गणपती मंदिराजवळ, काकडे वस्ती, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहितचा भाऊ प्रशांत (वय २९) याने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रोहित २८ ऑगस्ट रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरुन घरी निघाला होता. पिसोळी परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार रोहितला धडक दिली. अपघातात रोहित गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×