Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्‍याला अटक, अल्पवयीन ताब्यात

खडकी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मोबाईल चोरी, जबरी चोरीसह वाहन चोरी करणार्‍या चोरट्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २२ मोबाइल, ६ दुचाकी, टॅब असा ८ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आश्पाक आयुब शेख (वय २३, रा. आदर्शनगर, भाउ पाटील रोड, बोपोडी) याला अटक केली आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी, मोबाईल स्नचींग, जबरी चोरीसह वाहन चोरीचे गुन्हे वाढले होते. त्यासंबंधित पोलिसांकडून हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आले होते.

मित्राने अनैसर्गिक संबंध ठेऊ दिले नाही, वादातून केला खून – सविस्तर बातमी

तपास पथक पोलीस प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि गालीब मुल्ला, सुधाकर राठोड यांना वाहनचोरी करणारा आरोपी वाकडेवाडी बसस्थानकाजवळ आल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपी आश्पाक शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी विठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, आश्विनी कांबळे, अशिष पवार, संदेश निकाळजे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शिवराज खेड, अनिल पुंडलीक, प्रविण गव्हाणे यांनी केली.

तब्बल २२ मोबाइल, ६ दुचाकी जप्त

शहरातील विविध भागातून शेखने २२ मोबाईल चोरले होते. त्यासोबत ६ दुचाकी, टॅब त्याच्याकडून जप्त केला आहे. मोबाईल स्नॅचिंग, जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे उघड करण्यात पथकाला यश आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिग्विजय चौगले प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोबाइल चोरीसह वाहन चोरी करणार्‍या आरोपीला खडकी तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २२ मोबाइल, ६ दुचाकी, टॅब असा साडेआठ लाखांचा ऐवज जप्त केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे. – दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×