Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावा

‘ड्रीम प्रोजेक्ट’ची कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

marathinews24.com

पुणे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसह विविध विभागांच्या इमारतींच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

उपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा – सविस्तर बातमी

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अनिल पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारे हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे आहेत. यातील अनेक प्रकल्प हे आदरणीय दादांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहेत. त्यामुळे या प्रकल्पांची कामे वेळेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिल्या.

या प्रकल्पांना आपण स्वतः भेट देऊन पाहणी करणार असून, सर्व प्रकल्पांच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, कार्यकारी अभियंता उज्ज्वला घावटे, प्रशांत खैरमोडे, उपअभियंता अनिल बडे, शाखा अभियंता अनिल काकडे, नवनाथ शेळके आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×