पूजा सावंत, ईशा केसकर, प्राजक्ता गायकवाड, अक्षय टंकसाळे यांच्यासह कलाकारांची उत्स्फूर्त उपस्थिती
marathinews24.com
पुणे – श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हर्षवर्धन फाउंडेशन व एकता मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहीहंडी उत्सवाला अभिनेत्री पूजा सावंत, ईशा केसकर, प्राजक्ता गायकवाड, प्रीती सोनी, अभिनेता अक्षय टंकसाळे, नृत्यांगना शिवकन्या तोडकर, अध्यक्ष आकाश चव्हाण तसेच गोल्डन बॉईजचे सनी वाघचौरे आणि संजय गुजर उर्फ बंटी यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी उपस्थित कलाकारांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले.
शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा – सविस्तर बातमी
अभिनेत्री पूजा सावंत म्हणाल्या, “दहीहंडी उत्सव माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे. अशा सांस्कृतिक उत्सवांमुळे आपली परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. त्यामुळे असे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होणे आणि ही परंपरा कायम टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, “दहीहंडीचा उत्साह आणि त्यामागची एकजुटीची भावना खूप सुंदर आहे. अशा उत्सवांमधून महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडते.”
अभिनेत्री ईशा केसकर म्हणाल्या, “दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, तर एकत्र येण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सुंदर क्षण आहे. हर्षवर्धन फाउंडेशनने आयोजित केलेला हा सोहळा कौतुकास्पद आहे. अभिनेता अक्षय टंकसाळे म्हणाले, “दहीहंडीच्या माध्यमातून तरुणाईमध्ये संघभावना, उत्साह आणि एकजूट निर्माण होते. अशा भव्य आयोजनाचा भाग होता आल्याचा आनंद आहे.”
आयोजक स्नेहल सनी निम्हण म्हणाल्या, “श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीची परंपरा जपण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन केले. नागरिक आणि कलाकारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आमचा उत्साह आणखी वाढला आहे. या संपूर्ण उत्सवाचे आयोजन हर्षवर्धन फाउंडेशन व एकता मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. याबाबतची माहिती आयोजक सनी निम्हण आणि स्नेहल सनी निम्हण, संस्थापिका हर्षवर्धन फाउंडेशन यांनी दिली.






















