Breking News
पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटक

मोबाइल गेम खेळताना बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार- तरुण जखमी

जुन्या वादातून मारण्याचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबरला आंबेगाव परिसरात घडली. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक केली आहे. चंद्रकांत रामदास माने (रा. भेंडी चौक, आंबेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई पौर्णिमा रामदास माने (वय ४३, रा. हरणाई कॉम्प्लेक्स, टी-सी, भेंडी चौक, आंबेगाव बुद्रुक) यांनी आंबेगाव ठाण्यात फिर्याद दिली आहे.अतिश मोरे, सोन्या कोंढरे आणि सुरज डिंबळे यांना पोलिसांनी अटक केली.

उधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाण दाम्पत्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत हा ५ सप्टेंबरला इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी लावून घरी जात होता. त्यावेळी आरोपी त्याच्या मागावर आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी चंद्रकांत याच्याशी वाद घातला ‘चंद्या, खाली ये, आज तुला मारून टाकतो,’ अशी धमकी देत आरोपींनी त्याला मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तुलातून त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. आंबेगाव पोलिसांनी अतिश ऊर्फ मन्या उमेश मोरे, सोन्या हरीकाका कोंढरे, सुरज सुभाष डिंबळे, श्रेयस रूपेश काटे आणि दगड्या ऊर्फ ऋतिक बेलदरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस काटे, सोन्या आणि दगड्या बेलदरे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×