Breking News
हातउसने पैसे परत करण्याची बतावणी; युवतीवर अत्याचाराचा प्रयत्नगॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूकमहापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आगभरती परीक्षा पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासासाठी पुण्यात १२ सप्टेंबरला सल्लामसलतपुण्यात पार्किंगमध्ये गाडी लावताना तरुणावर गोळीबार, तिघांना अटकदातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूक

गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन १० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका महिलेची ९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला या बिबवेवाडी भागात राहायला आहेत.

महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी २६ ऑगस्ट रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. गॅस देयक थकीत आहे. देयक अदा न केल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला एपीके फाईल पाठविली. ही फाईल महिलेने उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून नऊ लाख ६६ हजार रुपये काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात जमा केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची ३४ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे येरवडा भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना रक्कम गुंतविण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतविली. तेव्हा चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात आणखी रक्कम गुंतविली. गेल्या दोन महिन्यात ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात ३४ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक केशव दिंडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×