Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचा १३४वा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

marathinews24.com

पुणे – पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचे पहिले श्री कसबा गणपती यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १३४ वर्षे पूर्ण होत असून, गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवार, १४ सप्टेंबर ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंबायोसिस येथे ‘माहेरवाशीण’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ – सविस्तर बातमी 

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागरणासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत तसेच १५ ते २४ सप्टेंबरदरम्यान सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन व आरती होणार आहे. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मंडळाच्या वतीने सर्व गणेशभक्तांना उत्सवात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

स्थळ : श्री कसबा गणपती मंदिर, पुणे
आयोजक : श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×