Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रे; दोघांवर गुन्हा दाखल

जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रे; दोघांवर गुन्हा

८ कोटींच्या व्यवहारातून २ कोटी ३५ लाख दिले

marathinews24.com

पुणे – जमीन विक्रीच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम विलास चाकणकर (रा. गारमळा, धायरी) आणि अक्षय रमेश मोरे (रा. न्यू कोपरे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. व्यावसायिक प्रविण प्रतापराव जगताप (वय ५५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात जांभुळवाडीतील दरी पुलावर विचित्र अपघात – सविस्तर बातमी 

जगताप यांची कासुर्डी (ता. भोर) येथे जमीन आहे. मार्च २०२३ मध्ये चाकणकर याच्यासोबत या जमिनीचा आठ कोटी रुपयांत विक्रीचा व्यवहार ठरला होता. त्यानुसार चाकणकरने १ कोटी ८५ लाख रुपये, तर त्याचा मित्र सचिन सुर्वे याच्यामार्फत ५० लाख रुपये, असे २ कोटी ३५ लाख रुपये जगताप यांना दिले. मात्र, २०२५ मध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने हा व्यवहार रद्द करण्यात आला. त्यानंतर जगताप यांनी २ कोटी ३५ लाख रुपये धनादेशाद्वारे (डी.डी.) परत केले. तसेच व्यवहार रद्द झाल्याची जाहीर नोटीसही प्रसिद्ध केली.

डिसेंबर २०२५ मध्ये अक्षय मोरे याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. चाकणकरने हीच जमीन जुलै २०२२ मध्ये २० लाख रुपयांना आपल्याला विकल्याचा दावा मोरेने केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, जगताप आणि चाकणकर यांची पहिली भेटच १० मार्च २०२३ रोजी झाली होती. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजेच १६ जुलै २०२२ रोजी जमीन विक्री झाल्याचे दर्शविणारी कागदपत्रे बनावट असल्याचा संशय निर्माण झाला. याच आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कात्रजच्या १ कोटींच्या दरोड्याशीही संबंध

दरम्यान, विक्रम चाकणकर याचे नाव कात्रज आणि नवले पुलाजवळ घडलेल्या एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणातही समोर आले होते. दि. १८ जुलै २०२६ रोजी व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्या वाहनातील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात चाकणकरसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेड-शिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजीजजब्बार मेस्त्री यांचा दरोड्याच्या प्रकरणातील आरोपींना मदत आणि संरक्षण दिल्याचा आरोप तपासात समोर आला होता. नांदेड सिटी पोलिसांनी चाकणकर आणि मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील (बीएनएस) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×