दुचाकीस्वार दोघे चोरटे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांच्या रडारवर
marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १७ सप्टेंबरला संध्यकाळी सव्वा पाचच्या सुमारास सहकारनगर मधील रणजित हाईट्स जवळ घडली आहे. भरदिवसा सोनसाखळी हिसकावून नेल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, Pune Crime News जेष्ठ नागरिकांनी चोरट्याचा माग काढण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
पीएमपीएमएल बसला आग; अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला – सविस्तर बातमी
Pune Crime News पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सहकारनगरमध्ये राहायला असून, १७ सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रणजित हाईटस जवळून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेजवळ गाडी घेतली. त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटे दिसेनासे झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहकारनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढत असल्याचे सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संघर्षी तपास करीत आहेत.
गणेशोत्सवात तगडा बंदोबस्त, तरीही चोरी
Pune Crime News शहरातील विविध भागात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहेत. प्रामुख्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य गणपती मंडळांसह चौकातील गणपती मंडपात पोलिस अमलदारांची गस्त आहे. दरम्यान, १७ सप्टेंबरला भरदिवसा जेष्ठेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्यामुळे सहकारनगर पोलिसांच्या कामागिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.बीट मार्शल, गुन्हे शाखेसह इतर पोलिसांच्या गस्तसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.
पीएमपीएल प्रवासात दोन लाखांचे दागिने चोरीला
Pune Crime News पीएमपीएल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी जेष्ठ नागरिक प्रवाशाच्या बॅगेतील २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना १२ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडी ते भेकराईनगर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी चिखली, पिंपरी- चिंचवड परिसरात राहणार्या ६६ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागात राहायला आहेत. ते १२ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडी ते भेकराईनगर मार्गावरील बसमधून प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील बॅगेतून सव्वा दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी माहिती होताच तक्रारदाराने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलीस कर्मचारी डी. ए. कांबळे तपास करत आहेत.





















