Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

Pune Festival 2027 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा -ॲड.आशिष शेलार

Pune Festival 2027

पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड .आशिष शेलार

marathinews24.com

पुणे – Pune Festival 2027 पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आश्वासित केले.

कैवल्यधाम येथील ‘गोर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिस’च्या अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी 

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात आयोजित सांस्कृतिक महोत्सवातील कार्यक्रमात ॲड. शेलार बोलत होते. यावेळी आमदार हेमंत रासने, राजेश पांडे, श्रीपाद अष्टेकर, कलाकार अथर्व सुधामे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवातील सहभागिता, सामाजिक व राष्ट्रप्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम, भाविकांची गर्दी, देखावे आणि परंपरा यामुळे या उत्सवाची व्याप्ती मोठी आहे. जगात अशा व्यापक स्वरूपाचा उत्सव अन्यत्र आढळणे कठीण आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर विधानसभेच्या पटलावर ऐतिहासिक निर्णय घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला, असे अॅड. शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या घरगुती व सार्वजनिक परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा आणि आठवणी bappa.org या व्यासपीठावर नागरिकांनी शेअर कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या माध्यमातून गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जगभर पोहोचविण्यासोबतच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा मान्यतेसाठी आवश्यक असलेले सांस्कृतिक दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘फोक लोक’ या कार्यक्रमांतील कलाकारांचे ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले.

Pune Festival 2027 गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याच्या मागणीला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲड. शेलार यांचे पुणेकर, गणेशभक्त व गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून, शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात राज्य शासनाच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी ॲड. शेलार यांचे अभिनंदन केले.

bappa.org वेब ॲपच्या माध्यमातून गणेशोत्सवातील संस्कृती, परंपरा आणि कला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाच्या कथा, आठवणी आणि कलाविष्कार या व्यासपीठावर नोंदवावेत, असे आवाहन श्रीपाद अष्टेकर यांनी केले.

यावेळी नागरिक, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×