सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरु
marathinews24.com
पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून महिलेने ९५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना (Khadki JewelleryTheft) खडकी बाजार परिसरात घडली. याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने एक महिला काही दिवसांपूर्वी आली होती. (Khadki JewelleryTheft) महिलेने बुरखा परिधान केला होता. महिलेेने दागिने खरेदीचा बहाणा केला. त्यानंतर सराफी पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून महिलेने प्लास्टिक ट्रेमधील जोडवी, तसेच सोन्याची कर्णफुले असा ऐवज चोरुन नेला. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सराफी पेढीच्या मालकांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. (Khadki JewelleryTheft) सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करत आहेत.
मदतीचा बहाणा करुन लुटले
बँक खातेदाराकडील रोकड चोरी बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या एका बँक खातेदाराकडील १० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याची घटना ओैंध रस्त्यावरील एका बँकेच्या आवारात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका खातेदाराने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय तक्रारदार हे अपंग आहेत. त्यांचे खडकीतील ओैंध रस्ता भागात असलेल्या एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे. १५ सप्टेंबर रोजी ते दुपारी पावणेएकच्या सुमारास व्हिलचेअरवरून बँकेत पैसे भरण्यासाठी गेले हाेते. बँकेच्या आवारात ते थांबले. त्या वेळी एक चोरटा तेथे आला. त्याने बँकेत पैसे भरणा करण्यासाठी मदतीचा बहाणा केला. तक्रादाराने चोरट्याला दहा हजार रुपये दिले. भरणा करण्यासाठी दिलेली पावती घेऊन चोरटा बँकेत गेला.
भरणा केल्यानंतर बँकेने दिलेली पावती चोरट्याने त्यांना दिली. खात्यात १० हजारांची रोकड भरल्याचे त्याने सांगितले. प्रत्यक्षात चोरट्याने तक्रारदाराच्या खात्यात रोकड जमा केली नव्हती. दहा हजार रुपयांची रोकड चोरुन चोरटा पसार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करत आहेत.






















