Breking News
Census 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

प्रभात फेरी, आदिवासी मेळाव्याद्वारे अभियानाचा शुभारंभ; १२ लाभार्थ्यांना पेसा दाखल्यांचे वाटप

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ (Seva Sankalp Abhiyan 2026) अंतर्गत दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा शुभारंभ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे करण्यात आला.

पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले – सविस्तर बातमी

अभियानाच्या शुभारंभानिमित्त प्रकल्प कार्यालयापासून पंचायत समिती चौकमार्गे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेपर्यंत ‘सेवा यात्रा’ स्वरूपात प्रभात फेरी काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम पथक, पारंपरिक वेशभूषा आणि योजनांची माहिती देणारे फलक यामुळे जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. या फेरीत ५०० हून अधिक आदिवासी बांधव, महिला बचत गटांच्या सदस्या, विद्यार्थी तसेच अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.

यानंतर आयोजित आदिवासी मेळाव्यात वनहक्क कायदा, शबरी महामंडळाच्या स्वयंरोजगार योजना, राणी दुर्गावती महिला बचत गट सबलीकरण, न्यूक्लियस बजेट व डीबीटी योजनांची माहिती देण्यात आली. (Seva Sankalp Abhiyan 2026) यावेळी १२ पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पेसा दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, पंचायत समिती आंबेगावच्या उपसभापती ज्योती पारधी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सुकाळवेडे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्या जनाबाई उगले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रियंका घनवट, संदीप पाटील व रवींद्र माळवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

आदिवासी पाडे-वस्त्यांपर्यंत विशेष प्रचार मोहीम

Seva Sankalp Abhiyan 2026 अभियानांतर्गत दुर्गम भागातील आदिवासी पाडे व वस्त्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी ध्वनिक्षेपकासह विशेष प्रचार रथ फिरविण्यात येत आहे. वनहक्क, शबरी महामंडळ, राणी दुर्गावती महिला बचत गट, डीबीटी व न्यूक्लियस बजेट आदी योजनांची माहिती देणारी पत्रकेही वितरित करण्यात येत आहेत. अभियानाच्या पुढील कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून जनजागृती, मार्गदर्शन आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×