Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधी

Pune Ganesh Visarjan

पुढील वर्षापासून नियोजनाची पोलीस आयुक्तांची माहिती

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘गेल्या दोन ते तीन वर्षांत तात्पुरत्या स्वरूपात लक्ष्मी रस्त्यावर मुख्य मिरवणुकीत सहभागाची संधी मिळालेल्या मंडळांना यंदा विशेष बाब म्हणून पुन्हा मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे. (Pune Ganesh Visarjan) मात्र, पुढील वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत नव्याने सहभागी झालेले किंवा तात्पुरत्या स्वरुपात सहभागी झालेल्या मंडळांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहिती – सविस्तर बातमी 

Pune Ganesh Visarjan  विसर्जन सोहळ्यात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होतात. मुख्य विसर्जन सोहळ्याचा प्रारंभ लक्ष्मी रस्त्यावर होते. टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, कर्वे रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत दोन ते तीन वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात मंडळांना परवानगी दिली होती. अशा १५० मंडळांना पोलिसांकडून नोटीस बजावली आहे. त्यानंतर संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.२१) पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे यावेळी उपस्थित होते.

चतु:शृंगी आणि शिवाजीनगर भागातील मंडळांना केळकर आणि कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, विसर्जन मिरवणुकीतील गर्दीनंतर नवीन मंडळांना मुख्य मिरवणुकीत सहभागी करून न घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांना यावर्षी विशेष बाब म्हणून केळकर आणि कुमठेकर रस्त्याने सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. उर्वरित मंडळांकडून अर्ज मागवले आहेत. त्यांना केळकर आणि कुमठेकर रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात येणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

‘महोत्सवी मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीत प्रथमच सहभागी होणाऱ्या मंडळांना केळकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले. दरम्यान, परवानगी नाकारलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘गेल्या वर्षीप्रमाणे लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक सोहळ्यात सहभागी होण्यास परवानगी द्यावी. विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस आधी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मुख्य मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी नाकारू नये’, अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केली.

गेल्या वर्षी ३२ तास विसर्जन सोहळा

Pune Ganesh Visarjan  गेल्या वर्षी विसर्जन सोहळ्यात टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत २३७ मंडळांना, लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत २६६ मंडळांना, केळकर रस्त्यावरून ७९ मंडळांना परवानगी देण्यात आली होती. कुमठेकर रस्त्यावरून २२ मंडळांना परवानगी देण्यात आली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीची सांगता ३२ तास २६ मिनिटांनी झाली. विसर्जन सोहळ्यास लागणारा वेळ कमी करण्यासाठी पोलसांनी लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन सोहळ्यात नवीन मंडळांना सहभागी करून न घेण्याची भूमिका घेतली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×