Breking News
Shiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

Pune Jewellery Theft : पुण्यात गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने लांबविले

Beed Theft News

चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Jewellery Theft : गणेशोत्सवात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्यात आले. याबाबत कोथरूड भागातील एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाही – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर शनिवार वाड्याजवळ विविध वस्तुंचे विक्री करणारे तात्पुरती दुकाने थाटण्यात आली आहेत. तक्रारदार महिला रविवारी (२० सप्टेंबर) खरेदी करत होती. त्या वेळी गर्दीत महिलेच्या गळ्यातील ३८ हजारांचे दागिने लांबविण्यात आले. याच परिसरात आणखी एका महिलेचे दागिने लांबविण्यात आले. पोलीस हवालदार राठोड तपास करत आहेत.

छत्रपती शिवाजी रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरण्यात Pune Jewellery Theft आल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याबाबत खडकी भागात राहणाऱ्या एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले तपास करत आहेत. १८ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास हुतात्मा बाबू गेणू मंडळाच्या उत्सव मंडप परिसरात एका महिलेच्या १२ हजार रुपयांचे दागिने लांबविण्यात आले. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार अहिरे तपास करत आहेत.

Pune Jewellery Theft याच परिसरात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. तक्रारदार महिला मूळची नांदेडची रहिवासी असून, ती १८ सप्टेंबर रोजी दर्शनासाठी आली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×