Breking News
Pune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान

Sassoon Hospital Worker Death : पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेला कामगार ठार

Sassoon Hospital Worker Death : पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेला कामगार ठार

ससून रुग्णालयाच्या वसतीगृहातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील पुणे स्टेशन परिसरात बी. जे. मेडीकल कॉलेज ससून हॉस्पिटलच्या आवारातील पाण्याची टाकी पाडताना काही भाग अंगावर पडून (Sassoon Hospital Worker Death) गंभीररित्या जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १६ सप्टेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली होती. कामगारांना सुरक्षिततेची साधने न पुरवल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश शंकर शिंदे (वय ४५, रा. माळशिरस, सोलापूर) असे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वसंत शिंदे (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीतील सराईत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. जे. मेडीकल कॉलेज वसतीगृहातील पाण्याची जुनी टाकी पाडण्याचे काम ठेकेदाराने घेतले होते. १६ जूनला मध्यरात्री टाकी खाली पाडताना कामगार सुरेश िंशदे यांच्या अंगावर काही भाग कोसळला.  (Sassoon Hospital Worker Death) त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले. जखमी शिंदेला मातीच्या ढिगार्‍याखालून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यांना सुरक्षित साधने न पुरवल्यामुळे सुरेश शिंदे हे कामावेळी जखमी झाले. त्यामुळे त्यांचा मृत्यूचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×