गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई
marathinews24.com
पुणे – पिस्तूल बाळगणार्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या युनीट (Nanded Pistol Arrest) तीनने अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, काडतुस, दुचाकी अशा शस्त्रसाठ्यासह वाहन जप्त केले. रोहन सुरेश राठोड वय २१, रा. नांदेडगाव) ओंकार सचिन मोरे वय २३ रा. शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना नांदेड गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळून ताब्यात घेण्यात आले.
त्याने लिंकवर क्लिक करताच गमावले ५ लाख – सविस्तर बातमी
Nanded Pistol Arrest गुन्हे शाखा युनीट तीनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे पथकासह २१ सप्टेंबरला नर्हे, सिंहगड रोड, नांदेड सिटी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी अमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना नांदेड गावाजवळ पिस्तूल बाळगून एकजण थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने रोहन राठोड याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केली. चौकशीत त्याने ओंकार मोरे याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने मोरेला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे, वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, विपुल गायकवाड यांनी केली.























