Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने विविध ठिकाणी वाहनतळांच (Pune Ganesh Visarjan Parking) व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक वाढणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक – सविस्तर बातमी 

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गणेश विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपलब्ध वाहनतळांमध्ये (Pune Ganesh Visarjan Parking) न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग; शिवाजी आखाडा वाहनतळ; देसाई कॉलेज; हमालवाडा,पत्र्यामारुती चौकाजवळ; गोगटे प्रशाला; एस एस पी एम मैदान, आरटीओ चौक; एस. पी. कॉलेज; पीएमपीएमएल मैदान, पुरम चौका जवळ; पेशवे पार्क सारसबाग; हरजीवन हॉस्पी समोर, सावरकर चौक; पाटील प्लाझा पार्किंग; पर्वती ते दांडेकर पूल; दांडेकर पूल ते गणेशमळा या ठिकाणांचा समावेश आहे.

याशिवाय गणेशमळा ते राजाराम पूल, निलायम टॉकीज, बीएमसीसी कॉलेज मैदान, आबासाहेब गरवारे कॉलेज, संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान, फर्ग्युसन कॉलेज, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड मैदान, मराठवाडा कॉलेज, पेशवे पथ, रानडे पथ, काँग्रेस हाऊस रोड, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड आणि नदीपात्रातील भिडे पूल ते गाडगीळ पूल या ठिकाणीही वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी (Pune Ganesh Visarjan Parking) नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि वाहनतळाच्या ठिकाणीच वाहने उभी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×