Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

Dhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Dhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यात १२० ठिकाणच्या ध्वनिपातळीचे निरीक्षण

marathinews24.com

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत आता ढोल-ताशा पथकांच्या आवाजाचीही ‘डेसिबल’ (Dhol Tasha Decibel Check) तपासणी केली जाणार आहे. आवाजाची मर्यादा ओलांडल्यास संबंधित पथकावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण केले जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी केवळ डीजे आणि ध्वनिवर्धकांपुरती मर्यादित न राहता ढोल-ताशा पथकांनाही लागू होणार आहे.

गणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था – सविस्तर बातमी 

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासूनच पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणाची Dhol Tasha Decibel Check मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली आहे. न्यायालयाने ध्वनिपातळीचे मोजमाप करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक नियोजन केले आहे.

गणेश मंडळांच्या ध्वनिवर्धक यंत्रणांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंडळांना चार ‘टॉप’ आणि चार ‘बेस’ स्पीकर वापरण्याची परवानगी आहे. मर्यादेपेक्षा Dhol Tasha Decibel Check अधिक स्पीकर वापरल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाची संपूर्ण ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त केली जाणार आहे. तर प्लाझ्मा स्पीकर आणि मिड-प्रेशर स्पीकरच्या वापरावरही निर्बंध कायम आहेत. ढोल-ताशा पथकांकडून वापरण्यात येणार्‍या ‘टोल’ या वाद्याच्या वापरावरील बंदीचीही अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ सूचना देऊन कारवाई थांबवली जाणार नसून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पथकातील ढोल-ताशा वादकांच्या संख्येवर बंधन नाही

Dhol Tasha Decibel Check ढोल-ताशा पथकातील ढोल-ताशांची संख्या किंवा पथकातील सदस्यसंख्येवर पोलिसांनी कोणतीही मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने वादक असलेल्या पथकांना मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. मात्र, पथकाचा एकत्रित आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही, याची जबाबदारी संबंधित पथकावर राहणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर होणार्‍या ध्वनिपातळीच्या मोजमापातून त्याचे निरीक्षण केले जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या कालावधीत आतापर्यंत निर्धारित ध्वनिपातळीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळांविरुद्ध २१ खटले दाखल केले आहेत. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या नियमभंगाविरोधात कारवाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×