२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत
marathinews24.com
पुणे – शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत व सुरक्षित राहावा, यासाठी महावितरणने व्यापक नियोजन केले आहे. MSEDCL Ganesh Visarjan पर्वती, शिवाजीनगर आणि रास्तापेठ या तीन विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके मिरवणूक मार्गांवर तैनात करण्यात आली असून, दि. २४ ते २६ सप्टेंबर तसेच मानाच्या गणपतींचे विसर्जन पूर्ण होईपर्यंत ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
पर्वती विभाग : MSEDCL Ganesh Visarjan महात्मा फुले मंडई कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहतील. विभागात एकूण १५ पथके, प्रत्येकी ३ कर्मचारी असे कार्यरत असतील. नियंत्रण कक्ष क्रमांक : ७८७५७६७२२७.
शुक्रवारपेठ-सदाशिवपेठ शाखेअंतर्गत मंडई परिसर, तुळशीबाग, दगडूशेठ गणपती परिसर, कुमठेकर रोड, एस.पी. कॉलेज, अलका चौक, रामेश्वर चौक ते मामलेदार कचेरी या भागांत ६ पथके, तर पेरुगेट चौकात आपत्कालीन पथक तैनात आहे. नवीपेठ-दत्तवाडी शाखेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, गांजवे चौक, दांडेकर पूल, जनता वसाहत, सिंहगड रोड-म्हात्रे पूल-म्हसोबा चौक परिसरात ९ स्वतंत्र पथके नियुक्त आहेत.
शिवाजीनगर विभाग : मोदी गणपती, शिवाजीनगर गावठाण आणि खडकी या तीनही शाखांमध्ये स्वतंत्र पथके नेमली आहेत. तक्रार क्रमांक : ७८७५७६७५३१. मोदी गणपती शाखेअंतर्गत समाधान चौक ते गणपती चौक, कुंठे चौक, शगुन चौक, चित्रशाळा चौक, गरुड गणपती चौक ते अलका चौक परिसरात पथके आहेत. MSEDCL Ganesh Visarjan शिवाजीनगर शाखेअंतर्गत पोलीस ग्राऊंड, कॉर्पोरेशन, वाकडेवाडी-संचेती हॉस्पिटल, पाटील इस्टेट परिसरात पथके तैनात आहेत. खडकी शाखेअंतर्गत सागर हॉटेल ते सोनार गल्ली, माऊली चौक ते राजमोल चौक, कँटोन्मेंट हॉस्पिटल ते गाडी अड्डा, भाटिया लॉज ते राम मंदिर विसर्जन मार्गांवर पथके नेमली आहेत.
यासोबतच लक्ष्मीरोडवर झुडिओ शेजारी दरवर्षीप्रमाणे यावेळीही देखरख कक्ष महावितरण उभारणार आहे. या देखरेख कक्षातून वरिष्ठ अधिकारी मिरवणूकीवर शेवटपर्यंत देखरेख ठेवून परिस्थिती हाताळतात.
रास्तापेठ विभाग : समाधान चौक, लाल महाल चौक आणि पासोड्या विठोबा मंदिर चौक येथे प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांची पथके तैनात असून, आपत्कालीन वीजपुरवठा सुविधाही उपलब्ध आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळांची पाहणी करून विद्युत यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती पूर्ण केली असून, पथके मिरवणूक संपेपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत, असे प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले.




















