Breking News
Pune Traffic : धायरी, मुंढवा, हडपसर परिसरातील वाहतुकीतही बदलRegular Health Checkup : नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराचे धोके टाळण्यास मदत-डॉ. मृदुला जगतापआत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर उपक्रमPune Ganesh Visarjan : पुण्यात १० हजार पोलिसांचा फौजफाटा, गर्दीच्या नियोजनाला विशेष प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमारVishrantwadi Theft : महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरीRTO Cyber Fraud : ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूकTraffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनात

Pune Traffic : धायरी, मुंढवा, हडपसर परिसरातील वाहतुकीतही बदल

गणेश विसर्जन मिरवणुक

marathinews24.com

पुणे – Pune Traffic : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर धायरी, मुंढवा आणि हडपसर परिसरातील वाहतुकीतही गुरुवारी (२५ सप्टेंबर) बदल करण्यात येणार आहेत. धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौक मार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) वडगाव भाजी मंडईकडे जाणारी वाहतूकही याच कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

नियमित आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराचे धोके टाळण्यास मदत-डॉ. मृदुला जगताप – सविस्तर बातमी

धायरी फाट्याहून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीची कोंडी Pune Traffic होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळी ११ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे. स्वारगेटकडून येणाऱ्या वाहनचालकांना धायरी उड्डाण पूल, राजयोग सोसायटी चौक, नांदेड सिटी चौक आणि कॅनॉल पूलमार्गे धायरी तसेच उंबऱ्या गणपती चौकाकडे जाता येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव भाजी मंडईकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही याच कालावधीत निर्बंध राहणार आहेत. संबंधित वाहतूक गोयल गंगा चौकमार्गे सिंहगड कॉलेज रस्त्याकडे किंवा वीर बाजी पासलकर चौकमार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, केशवनगर, मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरात २५ सप्टेंबरला सकाळी सहा वाजल्यापासून गणेश विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. या परिसरातील वाहतुकीचे नियोजन विसर्जन मिरवणुकीची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत Pune Traffic ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, केशवनगर येथून मांजरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी मांजरी रस्त्याचा थेट वापर न करता रेणुका माता मंदिराजवळून मांजरी रस्त्याकडे जावे. तसेच गायरान वस्तीहून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी रेणुका माता मंदिराजवळून डावीकडे वळून व्यंकटेश ग्राफिक्समार्गे मुंढवा चौकाकडे जावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×