फॉर्मर आयडी, आधार-ओटीपी पडताळणी आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
marathinews24.com
बारामती – महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ अन्वये महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी (Women Farmer Certificate) नोंदणी प्रक्रियेबाबत इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे गणेश मंडळ छावा ग्रुप येथे जिल्हा माहिती कार्यालयाचे वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात भिगवन च्या सहाय्यक कृषी अधिकारी पल्लवी काळे यांनी मार्गदर्शन केले.
मातंग समाजाचा २९ सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी एल्गार महामोर्चा – सविस्तर बातमी
यावेळी काळे यांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी (Women Farmer Certificate) ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. महिला शेतकऱ्यांचा फॉर्मर आयडी काढणे, त्याची नोंदणी करणे तसेच पोर्टलवर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
शेती आणि शेतीपूरक कामांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी, यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ लागू करण्यात आला आहे. जमिनीची मालकी नसली तरी शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे. यामध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग करणाऱ्या महिलांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
पोर्टलवर अर्ज करताना आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी, वैयक्तिक माहिती भरणे, शेतीविषयक तपशील नोंदविणे तसेच फॉर्मर आयडी जोडण्याची प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अर्जातील माहिती अचूक भरूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले.
(Women Farmer Certificate) महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक संख्येने ऑनलाइन नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती काळे यांनी केले. ‘लोकसंवाद-२०२६’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक ऑनलाइन प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेता आल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.




















