लॅपटॉपसह मोबाइल जप्त
marathinews24.com
पुणे – Swargate ST Bus Theft : शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाची लॅपटॉपची बॅग चोरणार्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २८ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास घडली होती. राजू सोमाजी सावंत (वय ५६ रा. आष्टा, वाळवा, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.
ज्येष्ठाचा वाहनाचा धडकेत मृत्यू; कात्रज बाह्यवळण मार्गावर अपघात – सविस्तर बातमी
तक्रारदार हे २८ सप्टेंबरला स्वारगेट एसटी स्थानकातील वॉशरुमला गेले होते. त्यावेळी त्यांनी लॅपटॉपसह मोबाइल असलेली बॅग बाहेर ठेवली होती. नेमकी संधी साधून चोरट्याने बॅग चोरून नेली. Swargate ST Bus Theft याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पोलीस अमलदार काशिनाथ कुडाळकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी त्यांना एकजण संशयास्पद बॅग घेउन जाताना दिसून आला होता. दरम्यान, ३० सप्टेंबरला कुडाळकर आणि नेताजी वासुदेव हे पेट्रोलिंग करीत होते.
पोलिसांना पाहून लॅपटॉपची बॅग बाळगलेला संशयित पळून जाउ लागला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन राजू सावंत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाइल असा ३० हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विक्रम भारमळ, पोलीस निरीक्षक प्रदीपिंसग सिसोदे, स्मिता सिताप, नेताजी वासुदेव यांनी केली आहे.























