कात्रज बाह्यवळण मार्गावर अपघात
marathinews24.com
पुणे – Accident News : सकाळी फिरायला निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाहनाचा धडकेत मृत्यू झाल्याची घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर घडली. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संभाजी गोविंद साळुंखे (वय ७५, रा. गणेश चेंबर्स, साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. उमेश साळुंखे (वय ४७) यांनी आंबेगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील विश्रांतवाडीत तरुणाला लुटले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी साळुंखे हे दररोज सकाळी फिरायला जायचे. गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले. Accident News कात्रज देहूराेड बाह्यवळण मार्गावर अभिनव महाविद्यालयासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर साळुंखे यांना वैद्यकीय मदत न करता वाहन चालक पसार झाला. साळुंखे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.
सोलापूर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष माणिक गायकवाड (वय ३५, रा. प्रथमा हाऊसिंग सोसायटी, रामटेकडी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सोमनाथ (वय ३६) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांच्या नात्यातील एकाचे निधन झाले होते. त्यांचा भाऊ सुभाष हे अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधीवरुन ते दुचाकीवरुन घरी परतत होते. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील रामटेकडी भागात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सुभाष यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाष यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव तपास करत आहेत.























