तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Crime News : सोशल मीडियावरील एका उपयोजनावरून (गे डेटिंग ॲप) झालेली ओळख तरुणाला महागात पडली. तरुणाला विश्रांतवाडी परिसरात बोलावून त्याला लुटण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका २२ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी पेठेत वाहतूक बदल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २२ वर्षीय तरुण भोसरी परिसरात राहायला आहे. तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. समाज माध्यमातील एका ॲपच्या माध्यमातून त्याची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने त्याला विश्रांतवाडीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत भेटायला बोलाविले. २९ सप्टेंबर रोजी तक्रारदार Crime News तरुण सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तरुण विश्रांतवाडी परिसरात गेला. तेथे त्याला तीन आरोपी भेटले. आरोपीने त्याला मनोरुग्णालयाजवळ मोकळ्या जागेत नेले. त्यानंतर आरोपीबरोबर असलेले दोन साथीदार तेथे आले. तरुणाला प्लास्टिक पट्टीने मारहाण करण्यात आले.
आरोपींनी त्याचा मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाइलवरील आर्थिक व्यवहार करणाऱ्या ॲपचा सांकेतिक शब्द घेतला. आरोपींनी तरुणाच्या बँक खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले. ही रक्कम आरोपींनी एका खात्यात जमा करुन घेतली. तरुणाला जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यास जीवे मारु, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.
घाबरलेल्या तरुणाने गुरुवारी (१ ऑक्टोबर) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.
बाणेर रस्ता, ससून रुग्णालय परिसरात दोघांना लुटले
Crime News : बाणेर रस्ता, ससून रुग्णालयाच्या परिसरात दोन तरुणांना वेगवेगळ्या घटनांमध्ये लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली. बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोन्याचे कडे, सोनसाखळी, रोकड असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.
ससून रुग्णालयाच्या परिसरात एका मजुरी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याच्याकडील सात हजार रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. बाणेर भागातील लुटमारीच्या घटनेत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास तक्रारदार ३२ वर्षीय तरुणाला लुटण्यात आले. ससून रुग्णालयाच्या परिसरातील पीएमपी थांब्याजवळ गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका तरुणाला धमकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या पाकिटातील सात हजार रुपयांची रोकड लुटली. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत























