Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Pune Voter Registration Duty : मतदार नोंदणीचे कर्तव्य न बजाविल्याने अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा

Pune Voter Registration Duty : मतदार नोंदणीचे कर्तव्य न बजाविल्याने अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा

कारणे दाखवा नोटिशीलाही उत्तर न दिल्याने वाघोली पोलिसांत कारवाई

marathinews24.com

पुणे – Pune Voter Registration Duty :अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर कामावर गैरहजर राहिल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत वाघोलीचे ग्राम महसूल अधिकारी गोकुळ भगत यांनी फिर्याद वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिला शुभांगी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जेष्ठाला एसआरआय जुळत नसल्याची बतावणी, १० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता महिलेची मतदान केंद्र ३४० ते ३४९ साठी अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती केल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर झाल्या नाहीत. Pune Voter Registration Duty त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, त्यांनी या नोटिशीला उत्तर दिले नाही. शासकीय आदेशानुसार सोपविण्यात आलेले राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम ३२ अन्वये कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×