हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – SIR Cyber Fraud : निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉटसअॅपद्वारे मेसेज करुन एसआरआय जुळत नसल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून बँक खात्याचा तपशील घेउन तब्बल १० लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ ते १९ ऑगस्ट २०२६ कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी ७४ वर्षीय नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, ते वडगाव खुर्दमध्ये राहायला आहेत.१५ ऑगस्टला सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाइलवर व्हॉटसअॅपद्वारे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचा मेसेज पाठवला. त्यांच्या वडिलांचे नाव एसआयआरमध्ये मॅच होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर SIR Cyber Fraud चोरट्याने तक्रारदाराकडून बँक डिटेल्स घेउन पैसे वर्ग करण्यास सांगितले. मेसेज, ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून सायबर चोरट्याने तक्रारदाराची तब्बल ९ लाख ९२ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.
कंपनी व्यवहार पाहणारा व्यक्ती भासवून ऑनलाइन लुट
जर्मनीतील कंपनी व्यवहार पाहणारा व्यक्ती असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी एकाची तब्बल ८ लाख ९२ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना २५ फेबु्रवारी ते २० मे २०२५ कालावधीत वडगाव खुर्दमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय नागरिकाने नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायबर चोरट्याने फेबु्रवारी ते मे २०२५ कालावधीत तक्रारदाराला मेल पाठवला. जर्मनीतील त्यांच्या कंपनीचा व्यवहार पाहणारा व्यक्ती अलेक्झंडर सिबील नाव वापरले. त्यानंतर शिल्लक पेमेंट ऑनलाईन दिलेल्या बँकखात्यात वर्ग करण्यास भाग पाडून फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण तपास करीत आहेत.























