दिवेआगर ८ मुलांचा बुडून मृत्यू प्रकरण शेकले
marathinews24.com
पिंपरी – Winners Academy Sealed : दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना ११३७, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उघडकीस आले. त्यानुसार अकादमी सील करण्यात आली.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाची बॅग चोरणार्याला अटक – सविस्तर बातमी
आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. Winners Academy Sealed या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.























