Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Swargate ST Bus Theft : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाची बॅग चोरणार्‍याला अटक

Swargate ST Bus Theft

लॅपटॉपसह मोबाइल जप्त

marathinews24.com

पुणे – Swargate ST Bus Theft : शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाची लॅपटॉपची बॅग चोरणार्‍याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २८ सप्टेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास घडली होती. राजू सोमाजी सावंत (वय ५६ रा. आष्टा, वाळवा, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.

ज्येष्ठाचा वाहनाचा धडकेत मृत्यू; कात्रज बाह्यवळण मार्गावर अपघात – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे २८ सप्टेंबरला स्वारगेट एसटी स्थानकातील वॉशरुमला गेले होते. त्यावेळी त्यांनी लॅपटॉपसह मोबाइल असलेली बॅग बाहेर ठेवली होती. नेमकी संधी साधून चोरट्याने बॅग चोरून नेली. Swargate ST Bus Theft याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने पोलीस अमलदार काशिनाथ कुडाळकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी त्यांना एकजण संशयास्पद बॅग घेउन जाताना दिसून आला होता. दरम्यान, ३० सप्टेंबरला कुडाळकर आणि नेताजी वासुदेव हे पेट्रोलिंग करीत होते.

पोलिसांना पाहून लॅपटॉपची बॅग बाळगलेला संशयित पळून जाउ लागला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन राजू सावंत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाइल असा ३० हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विक्रम भारमळ, पोलीस निरीक्षक प्रदीपिंसग सिसोदे, स्मिता सिताप, नेताजी वासुदेव यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×