Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन; कुटुंबीयांचे केले सांत्वन

marathinews24.com

पुणे – Nana Patekar Funeral : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर आज डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार भाई जगताप, हेमंत पाटील, अनिकेत तटकरे, गोपीचंद पडळकर, अमित गोरखे, भिमराव तापकीर, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, महापौर मंजुषा नागपुरे, सभापती युवराज काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,
यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (Nana Patekar Funeral)

मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण केली. प्रदीर्घ कलाप्रवासात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनावर ठसा उमटविला. अभिनयासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.

अंत्यसंस्कारापूर्वी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डोणजे येथे नागरिक, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, चाहते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पोलिस दलाच्यावतीने शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×