लक्ष्मीनगर पोलिसांकडून तपास सुरू
marathinews24.com
पुणे – Yerwada Mobile Theft : येरवडा मेट्रो स्थानकाजवळ तरुणाचा ७० हजार रुपयांचा मोबाइल ल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पोलीस ठाण्यातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव भागात राहायला आहेत. शनिवारी (१० ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास ते येरवडा मेट्रो स्थानक परिसरात मित्राची वाट पाहत थांबले होते. (Yerwada Mobile Theft) त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला. तक्रारदाराने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक निखील पवार तपास करत आहेत.
धनकवडीत घरफोडी; साडेसात लाखांचा ऐवज चोरी
फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगाव पठार भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेली दोन लाख १७ हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा सात लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे तपास करत आहेत.























