Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Lohgaon Police Custody Death : पुण्यात पोलीस ठाण्यातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप

Lohgaon Police Custody Death : पुण्यात पोलीस ठाण्यातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप

कुटुंबीयांचे आरोप पोलिसांनी फेटाळले

marathinews24.com

पुणे – Lohgaon Police Custody Death  : शहरातील लोहगाव पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीनंतर आकाश देवदास घलोत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याबाबत आकाशच्या आईने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. पुणे पोलिसांनी कुटुंबीयांचे आरोप फेटाळले आहेत. तरुणाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले. ‘शवविच्छेदन अहवालात बाह्य जखमा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल’, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक ‘लक्ष्य’ – सविस्तर बातमी 

आकाश घलोतला ५ ऑक्टोबर रोजी लोहगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. लोहगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी आकाशला काठी, (Lohgaon Police Custody Death) पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप आकाशची आई गीता यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. मारहाणीच्या घटनेची माहिती कोणाला दिल्यास कारागृहात पाठवू, अशी धमकी आकाशला देण्यात आली होती. त्यामुळे मारहाणीच्या घटनेची माहिती आकाशने सुरुवातीला कुटुंबीयांना दिली नव्हती, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

८ ऑक्टोबरला आकाशची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. घशातील संसर्ग आणि रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. ९ ऑक्टोबर रोजी आकाशने आई आणि बहिणीला पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याची माहिती दिली. त्याच दिवशी उपचारांदरम्यान दुपारी बाराच्या सुमारास आकाशचा मृत्यू झाला. आकाशला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी व्हावी, तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.

कुटुंबीयांचे आरोप पोलिसांनी फेटाळले

‘संबंधित प्रकरण अदखलपात्र (नाॅन काॅग्निजबल) स्वरूपाचे होते. दोन्ही बांजूकडून परस्परविरोधी तक्रारी, तसेच त्यांचे जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. त्यामुळे आकाश घलोतला ताब्यात घेणे किंवा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्याचा प्रश्न नव्हता. ५ ऑक्टोबर रोजी आकाश लोहगाव पोलीस ठाण्यात आला होता. त्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत टिपल्या गेल्या होत्या. नातेवाईकांच्या उपस्थितीत आकाशचे शवविच्छेदन करण्यात आलेे. शवविच्छेदन करताना चित्रीकरण करण्यात आले. प्राथमिक अहवालात आकाशच्या शरीरावर बाह्य जखमा आढळल्या नाहीत. अद्याप अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही. नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. कुटुंबीयांचे आरोप, लोहगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बाजू याबाबत चौकशी सुरू आहे. अंतिम शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट होईल,’ असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×